जळगाव | जळगावमध्ये उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. या उष्माघातामुळे आणखी एकाचा जीव घेला आहे.
तालुक्यातील वावडदा येथील उपसरपंच यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे रिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कमलाकर आत्माराम पाटील मृताचे नाव आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
वावडदा येथील उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील यांनी शुक्रवारी दिवसभर आपल्या शेतात काम केले. यानंतर रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांनाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
वावडदे शिवारात बिबट्याची दहशत असून यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे कमलाकर पाटील यांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन शेतात काम केले. मात्र यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सध्या कडाक्याचे उन असल्यामुळे आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असा सल्लादेखील डॉक्टरांनी दिला आहे.















Discussion about this post