Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका
बातमी शेअर करा..!

जळगाव | आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर, डी-मार्टजवळील मिश्री हाईट्स’ येथे अत्याधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्राचे उद्घाटन UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे उपमहासंचालक कॅप्टन लवकेश ठाकूर यांच्या हस्ते तहसीलदार शीतल राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित आज झाले. यावेळी युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपसंचालक मंदार जेवरे आदींसह सेवा पुरवठादार संस्था ‘बीएलएस’ चे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी आधारशी संबंधित तांत्रिक व गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी नागरिकांना मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे प्रवास, वेळ आणि खर्चाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अधिक त्रास होत होता. राज्य शासनाच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईत उपलब्ध असलेल्या अनेक सेवा आता जळगावमध्येच मिळणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

संपूर्ण केंद्र वातानुकूलित असून अत्याधुनिक संगणक प्रणाली, सुरक्षित नेटवर्क आणि डेटा प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. नवीन आधार नोंदणी तसेच 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रीक अपडेट, लोकसंख्या शास्त्रीय दुरुस्ती आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल व बायोमेट्रिक अद्ययावत करणे आदी सर्व सेवा येथे दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच केंद्र आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून सार्वजनिक सुट्यांमध्येही आवश्यक सेवा सुरू राहतील.

सेवा प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी करून टोकन प्रणालीद्वारे नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. तसेच आधारच्या संकेतस्थळावरुन आपल्या सोयीनुसार वेळ घेता येईल. त्यामुळे गर्दी, गोंधळ आणि रांगेत तासन तास थांबण्याची वेळ टळणार आहे. केंद्रात प्रशस्त आसनव्यवस्था, आठ स्वतंत्र सेवा काऊंटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आधुनिक केंद्रामुळे आधारविषयक सेवा अधिक सुलभ, जलद व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026
जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page