नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली विद्यापीठात असिस्टंट पदाच्या तब्बल २१५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव व रिक्त जागा
या भरतीअंतर्गत असिस्टंट पदाच्या एकूण २१५ जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली असेल.
शैक्षणिक पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठ, संशोधन संस्था, केंद्र किंवा राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), स्वायत्त संस्था किंवा किमान २०० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या नामांकित खासगी कंपन्या अथवा कॉर्पोरेट बँकांमध्ये ज्युनिअर असिस्टंट किंवा तत्सम पदावर किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
याशिवाय इंग्रजी टायपिंगचा वेग किमान ३५ शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदी टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय ३२ वर्षांपर्यंत असावे. अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी १,००० रुपये, OBC/EWS आणि महिला उमेदवारांसाठी ८०० रुपये, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी ६०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज कसा आणि कधी करायचा?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ अशी देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.















Discussion about this post