नंदुरबार । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे मेसेज आणि काही लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, हे मेसेज आणि लिंक बनावट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच काही लिंक शेअर करून त्यावर क्लिक करून e-KYC पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. मात्र, शासनाकडून सध्या अशी कोणतीही नवीन e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
प्रशासनाकडून महत्त्वाचे स्पष्टीकरण
नंदुरबारचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या e-KYC संदर्भात शासनाकडून अद्याप कोणत्याही नवीन सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा वैयक्तिक माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांनी काय काळजी घ्यावी?
लाडकी बहीण योजनेच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. तसेच अशा लिंकवर आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतरच e-KYC किंवा इतर कोणतीही प्रक्रिया करावी.















Discussion about this post