आज पुण्यात सायंकाळी सहा वाजता अंत्यविधी
जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांचे सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी ९.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. आर. एस. माळी यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना ओळखणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
डॉ. माळी यांचा अंत्यविधी आज सोमवारी, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील औंध स्मशानभूमीत होणार आहे. डॉ. आर. एस. माळी यांच्या निधनाने माळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,जावई,नातवंडे, इतर कुटुंबीय, नातेवाईक असा परिवार आहे.















Discussion about this post