Monday, November 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
बातमी शेअर करा..!

जळगाव । आकाशवाणीचे माजी केंद्र निदेशक, ज्येष्ठ कवी व साहित्यिक भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ (मराठी काव्यसंग्रह) आणि ‘तुकबंदी’ (हिंदी-उर्दू काव्यसंग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व समीक्षक, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.जे. महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र इंगळे तर अतिथी म्हणून अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी उपस्थित होते.

कवीच्या साहित्यप्रवासाचा गौरव

प्रास्ताविकात डॉ. सुधीर भटकर यांनी भगवान भटकर यांच्या साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. आकाशवाणीवरील प्रदीर्घ सेवाकाळात प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांच्यातील कवी सतत जागृत राहिला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचा ‘मागे राहिलेल्या कविता’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशितकेला होता.तर वयाच्या ९० व्या वर्षी दोन नवे काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आणले आहेत. त्यांच्या साहित्यनिर्मितीला मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी अर्थव प्रकाशनाचे युवराज माळी यांनी समर्थपणे पार पाडली. तसेच वा. ना. आंधळे आणि प्रा. रफिक काझी यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून काव्यसंग्रहांची उंची वाढविली, याबद्दल त्यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कविता म्हणजे मानवतेचा संदेश : डॉ. रफिक काझी

मनोगत व्यक्त करताना डॉ.रफिक काझी ‘राही’ म्हणाले की, साहित्यलेखन माणसाला चिरतरुण ठेवते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भगवान भटकर. त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि उत्साही जीवनाचे रहस्य त्यांच्या साहित्यप्रेमात दडलेले आहे. त्यांच्या कवितेत मानवताधर्माचा संदेश, संवेदनशीलता आणि मानवी भावभावनांची सखोल जाणीव प्रकर्षाने दिसून येते.

दलित आणि ललित साहित्याचा सुंदर संगम : वा. ना. आंधळे

सुप्रसिद्ध कवी वा. ना. आंधळे यांनी आपल्या मनोगतात भगवान भटकर यांच्या कवितेचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. त्यांच्या कवितेत दलित आणि ललित साहित्याचा सुंदर संगम आढळतो. उद्विग्नता, सामाजिक जाणीव, जागृती, चिकित्सा, दुःख, आनंद, प्रेम, जीवनमूल्ये आणि सामाजिक अभिसरण अशा विविध साहित्यिक मूल्यांचा आविष्कार त्यांच्या कवितेत होतो.

चारोळी, अभंग, हायकू, लावणी, ओवी आदी विविध काव्यप्रकारांचा सुंदर मिलाफ त्यांनी प्रसंगानुरूप साधला आहे. त्यांच्या कवितेत वेदना, विद्रोह आणि परिवर्तनाची हाक प्रभावीपणे उमटते. समाजातील समस्यांवर भाष्य करण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या कवितेवर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पीएच.डी. स्तरावर संशोधन होऊ शकते, यूअसेही त्यांनी नमूद केले. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कवितेत विद्रोह, विज्ञान आणि वैश्विक मानवता : प्रा. देवेंद्र इंगळे

अध्यक्षीय भाषणात प्रा. देवेंद्र इंगळे यांनी भगवान भटकर यांचा गौरव करताना त्यांनी ‘महाराष्ट्राचे अमीन सयानी’ अशी ओळख असल्याचे नमूद केले. त्यांच्या कवितेत विद्रोह, विज्ञाननिष्ठ विचार आणि वैश्विक मानवतेचा सुंदर आविष्कार आहे. कवीचे मन झिरपणे आणि पाझरणे म्हणजे काय, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. शालीनता, मृदुता आणि संवेदनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांची कविता होय. त्यांच्या कवितांना संगीतबद्ध करून उत्तम गीतांची निर्मिती होऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भगवान भटकर यांच्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी प्रकाशित झालेल्या या दोन काव्यसंग्रहांमुळे मराठी तसेच हिंदी-उर्दू साहित्यविश्वात मोलाची भर पडली असून, त्यांच्या साहित्यप्रवासाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

मनातील विचार आणि भावविश्व व्यक्त करता आले- भगवान भटकर

भगवान भटकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आकाशवाणीची सेवा बजावताना कविता लेखनाचा छंद त्यांनी जोपासला.मात्र प्रशासकीय कामांच्या व्यापामुळे मनातील भावभावना व्यक्त करण्याचे राहून गेले. आता पूर्वीचा एक आणि या दोन काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांना मनातील विचार आणि भावविश्व व्यक्त करता येत आहे. वा. ना. आंधळे आणि डॉ. रफिक काझी यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण समीक्षात्मक प्रस्तावनांमुळे या काव्यसंग्रहांची साहित्यिक उंची वाढली असून, ही बाब आयुष्यभर आनंद देत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. देवेंद्र इंगळे यांचे स्वागत उपकुलसचिव डॉ. मुनाफ शेख, कवी प्रा.वा. ना. आंधळे यांचे स्वागत वैद्य पी.एस. चौधरी, डॉ. रफिक काझी यांचे स्वागत होमिओपॅथी कन्सल्टंट डॉ. विलास महाजन, युवराज माळी यांचे स्वागत डॉ. सुभाष तळेले, कवी भगवान भटकर यांचे स्वागत प्रा. चारुदत्त गोखले,सौ. यशोदा भटकर यांचे स्वागत सौ. प्रज्ञा इंगळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौरव हरताळे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. सोमनाथ वडनेरे, कवी संतोष साळवे, डी.डी. पाटील (जामनेर) बाळकृष्ण तायडे (बुलढाणा) कवी शीतल पाटील, पुष्पा कोळी, वंदना ठुमके,एन.के. कोळी, निंबा पुना बडगुजर, गोविंद पाटील, शिवलाल बारी, सेवानिवृत्त प्रांताधिकारी प्रीतम तायडे, महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष मराठे,गोविंद सावदेकर, राहूल झांबरे, किशोर भारंबे,गोपाल चव्हाण , अनिल मस्के,अतुल पाटील, यशवंत गरुड, प्रल्हाद लोहार, मंगेश बाविसाने यांच्यासह जळगाव शहरातील तसेच जिल्ह्यातील मान्यवर नागरिक, साहित्यिक, कवी आणि शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘कुठे नेऊन ठेवलाय माझा जळगाव जिल्हा?’ दरोडा, गोळीबार अन् शेतकऱ्याच्या मृत्यूवरून रोहिणी खडसे आक्रमक

Next Post

जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंची महत्त्वाची माहिती

November 2, 2026
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; आमदार अनिल पाटलांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार? मुंबईतून तातडीचा निरोप

November 2, 2026
नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

November 2, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

November 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page