Monday, November 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; आमदार अनिल पाटलांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार? मुंबईतून तातडीचा निरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 2, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
बातमी शेअर करा..!

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अजित पवार गटाच्या नेत्यांची दिल्लीत झालेली भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले असून, मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. त्यातच माजी मंत्री अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत येण्याचा निरोप देण्यात आल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ उपस्थित आहेत. या बैठकीनंतर पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याने त्यामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचदरम्यान माजी मंत्री अनिल पाटील यांना मुंबईत तातडीने बोलावण्यात आले. निरोप मिळताच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे अजित पवार गटात मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाची तयारी सुरू आहे का आणि त्यात अनिल पाटील यांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मात्र, मुंबईला रवाना होण्यापूर्वी अनिल पाटील यांनी या चर्चांवर सावध भूमिका घेतली. आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणतेही ठोस विधान करण्याचे त्यांनी टाळले.

मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार अजितदादांनी व्यक्त केला होता. हा शब्द पूर्ण करायचा असल्यास त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, असे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुतीसोबत निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेकडून याबाबत शब्द मिळाल्याचे सांगत त्यांनी जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचेही नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सात जागांची मागणी करण्यात आली आहे. अर्ज छाननीनंतर या विषयावर अंतिम चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सन्मानजनक जागा न मिळाल्यास पक्षाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे समीकरण जुळवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना मुंबईत बोलावण्यामागे नेमके काय कारण आहे आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणते राजकीय निर्णय होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

Next Post

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंची महत्त्वाची माहिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंची महत्त्वाची माहिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल; दुष्काळ दौरा रद्द, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंची महत्त्वाची माहिती

November 2, 2026
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग; आमदार अनिल पाटलांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार? मुंबईतून तातडीचा निरोप

November 2, 2026
नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

November 2, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

November 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page