नवी दिल्ली । दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुढील राजकीय रणनीतीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच काँग्रेसच्या या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार दिल्लीत एकत्र येण्याची शक्यता असून, पुढील भूमिका आणि आंदोलनाची दिशा याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिल्लीत तीन हजार जणांना ताब्यात घेतल्याचा दावा
दरम्यान, दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून सुमारे तीन हजार लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील या आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे या आंदोलनाला राजकीय पातळीवर आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.















Discussion about this post