Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नापिकी, कर्जबाजारीपणा अन् रखडलेले अनुदान; छत्रपती संभाजीनगरात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव तालुक्यात नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शासकीय अनुदानाच्या विलंबाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कन्नड तालुक्यात विहिरीचे अनुदान रखडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील ६० वर्षीय शेतकरी विठ्ठल धुमा चव्हाण यांनी आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवले. विठ्ठल चव्हाण यांच्या कुटुंबात दोन मुले व तीन मुली असून, संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून होते. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. त्यांनी मागील तीन वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या योजनेतून विहीर खोदली होती; परंतु विहिरीच्या बांधकामाचे २ लाख रुपयांचे शासनाचे अनुदान अद्यापही मिळाले नव्हते. अनुदानासाठी त्यांनी तीन वर्षे चकरा मारल्या, तरीही बिल निघाले नाही.

यावर्षी त्यांनी २ एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती, मात्र पाण्याअभावी ती काढावी लागली. त्यानंतर त्याच क्षेत्रात कांद्याची लागवड केली, परंतु विहिरीतील पाणी आठ दिवसांतच संपल्याने कांदा पिक पूर्णपणे करपून गेले. याशिवाय, त्यांचे घरकुल गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असूनही अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे बांधकाम अपूर्ण होते. एका बाजूला कर्ज, नापिकी, विहिरीचे रखडलेले अनुदान आणि अपूर्ण घरकुल यामुळे नैराश्यात आलेल्या विठ्ठल चव्हाण यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

सोयगाव तालुक्यातही विष प्राशन करून शेतकऱ्याची जीवनयात्रा संपवली
दुसऱ्या एका घटनेत, सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून चंद्रकांत सखाराम नवगिरे या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवले. दुष्काळाच्या संकटात वाढलेल्या कर्जाच्या बोज्यामुळे त्यांनी हे टोकचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने या दोन्ही पीडित शेतकरी कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच रखडलेले विहीर आणि घरकुलाचे अनुदान तातडीने अदा करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा जोर वाढला; जळगावमध्ये पारा ३७.५ अंशांवर

Next Post

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! झेलम एक्स्प्रेससह ३ गाड्याच्या मार्गात मोठा बदल

October 8, 2026
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

October 8, 2026
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

October 8, 2026
भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; ताबडतोब करा अर्ज

दहावी, बारावी पाससाठी खुशखबर! भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती जाहीर

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page