जळगाव । गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

आजच्या दरवाढीनंतर १० ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह १ लाख ५२ हजार ४४० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर पुन्हा एकदा अतिरिक्त भार पडला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही तेजी दिसून आली आहे. एक किलो चांदीचा जीएसटीसह भाव २ लाख ३२ हजार ७८० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्यासोबतच चांदीच्या खरेदीसाठीही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील दरवाढ-घट ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. आगामी सणासुदीच्या काळात दर आणखी कोणती दिशा घेतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post