Monday, October 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव | दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणी, चारा, वीज, शेती आणि रोजगाराचे काटेकोर नियोजन करावे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष, टोलवाटोलवी किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. तालुका व जिल्हास्तरावर सुटणारे प्रश्न तातडीने निकाली काढा; राज्यस्तरावरील प्रश्न माझ्याकडे द्या, त्यांचा पाठपुरावा मी स्वतः करेन, असे स्पष्ट निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या अडीच तास चाललेल्या आढावा बैठकीत महावितरण, पीककर्ज, पाणी-चारा नियोजन, घरकुल, भूमी अभिलेख आणि प्रलंबित विकासकामांवर अधिकाऱ्यांना थेट जबाबदारी निश्चित करण्याचा सूर दिसून आला.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, सभापती गणेश पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दीपक पाटील, अरुण पाटील, शेतकरी सेनेचे सुनील पाटील, युवराज पाटील, पद्मसिंग पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळातील संभाव्य पाणीटंचाई, चारा उपलब्धता, शेतकऱ्यांच्या वीज तक्रारी आणि पीककर्ज यावर सविस्तर चर्चा झाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावपातळीवरील परिस्थिती समजून घेऊन अधिक संवेदनशीलतेने काम केले पाहिजे. पिण्याच्या पाण्याचे गावनिहाय नियोजन तयार ठेवावे, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होऊ देऊ नये आणि पुढे चारा टंचाई निर्माण होणार नाही यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात. धरण परिसरातून होणारा अनधिकृत पाणी उपसा थांबवून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला देण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटप अपेक्षेपेक्षा कमी असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त करत पात्र प्रकरणे तातडीने मंजूर करण्याचे सांगितले. याबाबत पुढील पंधरा दिवसांत पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार किशोर आप्पा पाटील वीज वितरण कंपनीवर भडकले
महावितरणच्या विषयावर बैठकीचे वातावरण अधिकच तापले. आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत जिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या चार-पाच वर्षांत ट्रान्सफॉर्मर आणि इतर सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही शेतकऱ्यांना आठ तास सलग वीज का मिळत नाही, आठ तास वीज कुठे जाते, स्मार्ट मीटरची बिले इतकी का वाढतात? असा सवाल उपस्थित केला. अनेक भागांत तीन-चार तासही नियमित वीज मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळणे, कमी दाबाचा पुरवठा आणि तक्रारींवर वेळेत प्रतिसाद न मिळणे याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटरमुळे येणारी अवाजवी बिले, मीटर फॉल्टी असल्याचे सांगून वीज कापणे आणि ग्राहकांना पुरेशी माहिती न देता दंड आकारणे यावरही आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. “निधीही देतो, सुविधा उपलब्ध करून देतो; तरी शेतकऱ्याला वीज मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे,” अशा शब्दांत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणला स्पष्ट इशारा देत, “दुष्काळात शेतकरी संकटात असताना केवळ नियम सांगून त्याला फिरवू नका. माणूस म्हणून त्याच्या अडचणीचा विचार करा. तक्रारी विनाविलंब सोडवा; निष्काळजीपणा चालणार नाही,” असे बजावले.

बैठकीत आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा व भडगाव नगरपरिषद हद्दीतील घरकुल आणि अतिक्रमण नियमितीकरण, घरकुलांसाठी जागेची उपलब्धता, भूमी अभिलेख विभागाकडील प्रलंबित मोजणी, भडगाव येथील सुकी नदी पात्राला नगर भूमापन क्रमांक देणे, पाचोरा-तारखेडा रस्त्याचे भूसंपादन, पाटबंधारे विभागाचे प्रलंबित प्रकल्प, भडगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागा, सामाजिक वनीकरण, महिला व बालविकास संबंधित प्रश्नांवरही चर्चा झाली., असा सूर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ विषय मार्गी लवण्याचे सुचन केल्या त्यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न संबंधित विभागांशी समन्वय साधून मार्गी लावले जातील, असे स्पष्ट केले. प्रस्तावांतील त्रुटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत आणि विभागीय समन्वयाअभावी नागरिकांची कामे अडकू देऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.

आमदार किशोर पाटील यांनी ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे आणि मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले. दिघी येथील घरकुलांचा प्रश्न, वनविभागाची प्रलंबित कामे आणि आवश्यक निधी बाबत तसेच कनाशी येथे श्रीकृष्ण दत्त मंदिराचा भव्य असा उत्सव ( महानुभाव पंथ मार्ग ) सुमारे ४० दिवस चालणारा हा कार्यक्रम व देशभरातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक लक्षात घेऊन भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधा कोणत्याही त्रुटीशिवाय उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेशही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

बैठकीत उपस्थित शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. अनेकांनी निवेदने देऊन आपल्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेवरच माहिती घेत अनेक प्रश्नांवर तत्काळ दिशा दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Next Post

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

बँकेतून पाठलाग, गॅरेजमध्ये डाव अन् ७७ हजारांची चोरी; ‘ऑपरेशन MP’मध्ये आरोपी जेरबंद

October 5, 2026
दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा

October 5, 2026
पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा पाय घसरला; बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

राज्यात १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती

October 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page