Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

घरातून अचानक गायब अन् थेट पद्मालयच्या जंगलात मृतदेह; जळगावातील महिलेच्या खुनाचा उलगडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 15, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
घरातून अचानक गायब अन् थेट पद्मालयच्या जंगलात मृतदेह; जळगावातील महिलेच्या खुनाचा उलगडा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून ३९ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कविता अरुण सुतार असं मृत महिलेचं नाव असून याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून अवघ्या काही दिवसांतच या गूढ प्रकरणाचा यशस्वी छडा लावला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी आठच्या सुमारास मृत कविता सुतार यांच्या घरात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज सुरू होते. त्यांनी आपल्या मुलासाठी जेवणाचा डबा तयार करून ठेवला होता. मात्र, त्यांचा मुलगा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर कविता घरात दिसून आल्या नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही सतत बंद येत होता. कुटुंबीयांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे तातडीने शोधाशोध केली, परंतु त्यांचा पत्ता लागला नाही. दिवसभर शोध घेऊनही त्या न मिळाल्यामुळे आणि मोबाईल बंद असल्याने, अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याची खात्री पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पद्मालयच्या घनदाट जंगलात आढळला मृतदेह

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि इतर  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे पोलीस तपासात महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. यादरम्यान, १३ सप्टेंबर २०२६ रोजी एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या शोधानंतर अपहरणाच्या गुन्ह्याचे रूपांतर थेट खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले.

तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जळगाव शहरात सापळा रचून संशयित नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून आपणच कविता सुतार यांचे अपहरण केले होते आणि त्यांना पद्मालयच्या जंगलात नेऊन दगडाने डोके ठेचून त्यांची हत्या केल्याची माहिती त्याने दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत. या थरारक घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी सनसनाटी पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हीच तर राजकीय फूट..; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार दावा; वाचा महत्त्वाचे मुद्दे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
घरातून अचानक गायब अन् थेट पद्मालयच्या जंगलात मृतदेह; जळगावातील महिलेच्या खुनाचा उलगडा

घरातून अचानक गायब अन् थेट पद्मालयच्या जंगलात मृतदेह; जळगावातील महिलेच्या खुनाचा उलगडा

September 15, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

हीच तर राजकीय फूट..; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार दावा; वाचा महत्त्वाचे मुद्दे

September 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बसस्थानकांवर महिलांचे दागिने चोरणारा आंतरजिल्हा चोरटा अटकेत ; ४.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 15, 2026
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना धनंजय मुडेंकडून पूर्णविराम; काय म्हणाले वाचा..

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल! नेमकं काय घडलं?

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page