जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी मिडटाउन क्लब, जळगाव यांच्या वतीने पाळधी येथील शिवम इंडस्ट्रीज, गट क्रमांक २८२, खर्ची रोड परिसरात आज १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
‘आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेला श्वासाचा अनमोल ठेवा’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष लावणे ही केवळ सुरुवात असून, त्यांचे नियमित संगोपन करून ते मोठे करणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास संजय सिंग, प्री. रोटेरियन किरण सिंग, सचिव डॉ. किरण सुपे, रोटेरियन डॉ. उषा शर्मा, रोटेरियन साधना पाटील, रोटेरियन दिनेश कक्कर, रोटेरियन विलास नायर, रोटेरियन डॉ. संतोष पोते, रोटेरियन सुधीर चौधरी, रोटेरियन सुरेंद्रजी छाब्रा, रोटेरियन मनोज पाटील, रोटेरियन श्रीरंग पाटील, रोटेरियन विवेक वडजीकर आणि रोटेरियन मुकेश परदेशी आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.















Discussion about this post