अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १३९ सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm पदवीधारक उमेदवारही संबंधित पदांसाठी पात्र असतील. पदानुसार NET, SET किंवा Ph.D. ही अर्हता आवश्यक राहणार आहे.
या भरतीसाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय ५९ वर्षांपर्यंत असावे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नागपूर येथे करण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क :
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |















Discussion about this post