Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in महाराष्ट्र
0
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा गंभीर दावा शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पेपरफुटीचे रॅकेट कसे सक्रिय होते, याचे सविस्तर सादरीकरण केले. पेपर सेट करणाऱ्यालाच ‘सेट’ करून हा पेपर फोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकारामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपशीलवार खुलासा करत सांगितले की, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका २० मार्चलाच काही उमेदवारांपर्यंत पोहोचली होती. व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्न आणि संभाव्य उत्तरे पाठविण्यात आली होती. उमेदवारांना संशय येऊ नये म्हणून “१० प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवा”, अशा सूचनाही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

‘पेपरसाठी १२ लाखांची डील’

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, एका प्रश्नपत्रिकेसाठी ₹१२ लाखांचा व्यवहार ठरला होता. त्यापैकी ₹५ लाख आगाऊ देण्यात आले होते, तर उर्वरित ₹७ लाख निकालानंतर देण्यात येणार होते, असा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात बार्शी कनेक्शन असल्याचाही आरोप त्यांनी केला.

भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की, परीक्षेचा कट-ऑफ १०५ गुण असताना १०३ गुण मिळालेल्या उमेदवारालाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. हे कशाच्या आधारे झाले? यामागे कोणाचा दबाव होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, नंदुरबारमधील एका नायब तहसीलदाराच्या मुलाला १४९ गुण मिळून १३ वी रँक, तर मुलीला १४८ गुण मिळून १६ वी रँक मिळाली. दोघांनाही जवळपास समान गुण आणि रँक मिळणे हा निव्वळ योगायोग आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निकालाचीही चौकशी करण्याची मागणी केली.

‘पेपर सेट करणाऱ्याचीही चौकशी व्हावी’

रोहित पवार यांनी नीट पेपरफुटीचा संदर्भ देत, “ज्याने पेपर तयार केला, त्याच्याकडूनच तो बाहेर गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीची आणि त्यामागील सूत्रधारांची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेले हे आरोप असून, या आरोपांबाबत एमपीएससी किंवा राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

Next Post

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

UPSC कडून ८२८ प्रिन्सिपल व व्हाइस-प्रिन्सिपल पदांची भरती; १४ ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; ७ किलो गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

July 27, 2026
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

July 27, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page