नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या राज्यांमधील मतमोजणीचे प्राथमिक निकाल (कल) जाहीर केले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेतली आहे, तर काही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष १०५ जागांवर आणि भाजप १२५ जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजप ६८ जागांवर, तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे.
केरळमध्ये डावे पक्ष ५२ जागांवर आणि काँग्रेस ८३ जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये भाजप २२ जागांवर आणि काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके ४६ जागांवर आणि एआयडीएमके ३० जागांवर आघाडीवर आहे.
तर तिकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्येच पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे. सुवेंदू अधिकारी दोन्ही जागेवर आघाडीवर दिसत आहेत. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये डीएमके ५९ जागांवर आघाडीवर आहे, त्याखालोखाल टीव्हीके १६ आणि एआयएडीएमके ३ जागांवर आहेत. तर भाजप आणि काँग्रेस या टप्प्यावर कोणत्याही जागेवर आघाडीवर नाहीत. इतर पक्ष ५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत.















Discussion about this post