Saturday, May 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 2, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेश शिंदे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या अधिकृत कार्यक्रमाला अनुपस्थित राहून आमदार शिंदेंनी बंडाचे संकेत दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

कोरेगाव शहरात नुकतेच शिवसेना संपर्क कार्यालय आणि तीन शाखांचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले. शिवसेनेच्या या संघटनात्मक कार्यक्रमात स्थानिक आमदार महेश शिंदे यांची उपस्थिती अनिवार्य मानली जात होती. मात्र, केवळ ते गैरहजरच राहिले नाहीत, तर कार्यक्रमाच्या अधिकृत बॅनरवरूनही त्यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना आमदार महेश शिंदे म्हणाले की, “माझे आधीच अनेक कार्यक्रम नियोजित होते. एकाच दिवसात ६८ कार्यक्रम आणि ४२ विवाह सोहळे असल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही.” बॅनरवरील फोटो काढल्याबद्दल विचारले असता, त्यांनी फारसे महत्त्व न देता सूचक विधान केले. “कोणीही कायमस्वरूपी पद घेऊन आलेले नसते. मी विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. जे लोक कालपर्यंत विरोधात होते, ते आज मंचावर बसले असतील तर अशा गोष्टींकडे मी गांभीर्याने पाहत नाही,” असे म्हणत त्यांनी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.

भाजपची ‘ओपन ऑफर’; जयकुमार गोरेंनी टाकली गुगली –
एकीकडे महेश शिंदे यांची नाराजी समोर येत असतानाच भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी यात उडी घेतली आहे. गोरे यांनी महेश शिंदे यांना थेट भाजपमध्ये येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.“महेश शिंदे हे आमच्याच विचारसरणीचे आहेत. जर त्यांना सध्याच्या ठिकाणी काही अडचण वाटत असेल, तर त्यांनी खुशाल भाजपमध्ये यावे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. सातारा जिल्ह्यात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील,” असे विधान जयकुमार गोरे यांनी केले आहे.

महेश शिंदे हे सातारा जिल्ह्यातील शिंदे गटाचे एक वजनदार आमदार मानले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जर त्यांनी भाजपची वाट धरली, तर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जाईल.पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यातील हा ‘कोल्ड वॉर’ आता कोणता वळण घेतो आणि भाजपची ही ‘ऑफर’ महेश शिंदे स्वीकारतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page