Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा-  पालकमंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मैदानावर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव । जनगणना ही केवळ लोकसंख्येची गणना नसून देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक व पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना  केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्ताने येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री  बोलत होते.

या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिश सहाय, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण,स्वातंत्र सैनिक, नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या  शुभेच्छा देऊन, पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, यावर्षी ही जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्णतः डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २६ या कालावधीत “स्वयं गणना” नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात माझ्यापासून होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमांतर्गत १ प्राथमिक आरोग्य केंद्र व १७ उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे,  “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” मोहिमेद्वारे लोकसहभागातून आरोग्य जनजागृती, माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण निर्मूलन व स्वच्छतेवर प्रभावी भर दिला जात आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाखो लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असून सुमारे ४ लाख नागरिकांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. यासाठी शासनामार्फत ९१८ कोटी ५२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे.

रोजगार व शेती क्षेत्रातही विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात कामगिरी करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ हजार ६ नवीन उद्योगांना बँकांकडून मंजुरी मिळाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे ८ लाख ५१ हजार शेतकरी व ६ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शासनाने ७०९ कोटी ६२ हजार रुपयांची मदत मंजूर करून त्यापैकी ५१३ कोटी २१ लाख रुपये थेट ६ लाख ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

जिल्ह्यात गेल्यावर्षी विविध कल्याणकारी योजनांतून कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला असून यामध्ये ५८ हजार ६०७ कामगारांना सुरक्षा कीट, १लाख  ७८ हजार लाभार्थ्यांना गृह उपयोगी संच,२ लाख ४९ हजार कामगार व कुटुंबियांची यांना आरोग्य तपासणी तसेच १४ हजार ३५० लाभार्थ्यांना ३६ कोटी ६० लाखांचे आर्थिक सहाय्य देत कामगारांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाला भक्कम आधार मिळाला आहे.

नागरिकांनी वाढते तापमान लक्षात घेता उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. विशेषतः शेतकरी बांधव आणि कामगार वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घेत सकाळी आणि सायंकाळीच कामे करावीत. प्रखर उन्हामुळे उष्माघात, थकवा आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे सांगत सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यावासीयांना त्यांनी केले. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली त्यानंतर त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदीची भेट घेतली व त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विभागातंर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा  कार्यालय,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय यांचा समावेश आहे.

याप्रसंगी  पोलीस , होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, आरोग्य विभाग, महानगरपालिका अग्निशमन आदी विभाग परेड संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला  शासकीय कर्मचारी, नागरिक,  विद्यार्थी  उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र पोलीस दलातील 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शाहू महाराजांचा विचार म्हणजे सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 26, 2026
जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

जळगावात ठाकरे गट आक्रमक; बंडखोर खासदारांच्या फोटोंना मारले जोडे, तर राऊतांच्या फोटोला दुग्धाभिषेक!

June 26, 2026
पंढरपूरला जाण्यासाठी ‘या’ स्पेशल गाड्या ‎खान्देशातून धावणार

आषाढी एकादशीसाठी रेल्वेची विशेष तयारी; भुसावळ-पंढरपूरसह चार विशेष गाड्या धावणार

June 26, 2026
अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

June 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page