जळगाव । राज्यात १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसोबतच, गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठीही हालचालींना वेग आला आहे. जळगावातून विधान परिषदेवर जाण्यासाठी महायुतीमधील दोन्ही प्रमुख पक्ष, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने येण्याची शक्यता असून, इच्छुकांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत
भाजपकडून नंदूकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांची नावं चर्चेत आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष विधानपरिषदेच्या जागेवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती.दोन्ही पक्षांत एकच उमेदवार देण्यावर एकमत झाले, तर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल अशी माहिती आहे.भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास आणि दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार कायम ठेवल्यास जिल्ह्यात ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत होण्याची शक्यता आहे.














Discussion about this post