नवी दिल्ली । जागतिक राजकारणातील तणाव आणि इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. यात देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू शकतात असं सांगण्यात आलेले आहे. मात्र, केंद्र सरकारने या सर्व बातम्यांचे अधिकृतपणे खंडन केले असून, इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारने काय म्हटले?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत स्पष्ट केले की, इंधनाचे दर वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. “अशा बातम्या केवळ अफवा असून त्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत,” असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
पेट्रोलियम मंत्रायलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा असा एकमेव देश आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर जरी वाढले तरी त्याचा थेट भार नागरिकांवर पडू नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवाढ करण्याची गरज पडलेली नाही.















Discussion about this post