पुणे : अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका करून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तीन पत्रकार परिषदांमध्ये प्रेझेंटेशन आणि पुरावे सादर करत DGCA आणि काही मंत्री-नेत्यांवर आरोप केले. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते का बोलत नाहीत, असा सवाल उपस्थित केला होता.
या मागणीवर आता आमदार अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल पाटील यांनी सांगितले की, अपघातानंतर सध्या सीआयडी तपास सुरू आहे आणि तपास पूर्ण होईपर्यंत गोपनियतेची आवश्यकता आहे. त्यांनी रोहित पवारांनी सादर केलेले प्रेझेंटेशन काही दोषींना मदत करणारा ठरू शकतो, असेही स्पष्ट केले.
एखादा अपघात किंवा मृत्यू झाला असेल, नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल, याची पोलीस स्टेशनला नोंद केली जाते. विमानाचा अपघात म्हणाल्यानंतर त्याच्यात विमानात असलेले दोष,टेक्निकल माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु आहे डीजीसीएकडून अनियमीतता शोधण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली आहे, सीआयड़ी तपास सुरू आहे. या सगळ्या गोष्टींची गोपनियता ठेवावी लागते. यात कुणी दोषी असेल, कनक्लुजनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गोपनियता ठेवली पाहिजे. असे अनिल पाटील म्हणाले.
आजपर्यंत ही गोपनियता ठेवली गेलेली आहे. एकदा अहवाल आला की विमानाचा मालक दोषी आहे की या यंत्रणेत अजून कोणी दोषी आहे का, घातपात आहे का, सीआयडीचा तपास सुरू आहे. हा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि एफआयआर आपल्याला दाखल करता येईल. पण आम्हाला कधी कधी शंका वाटते की हा एक प्रकारे गोपनियता न पाळता जो कोणी या प्रकारात दोषी आढळणार आहे. त्याला एकप्रकारची मदत ही वेगवेगळे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे प्रेझेंटेशन दाखवून ती समोरच्यांना एकप्रकारची मदत होत आहे, असा आरोप आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. तर ही मदत त्या दोषीला न होऊ देता समजा जर त्या तपास यंत्रणांपर्यंत ही माहिती रोहित पवार यांनी दिली तर दोषींवर कारवाई होऊ शकते असे वक्तव्य अनिल पाटील यांनी केले.















Discussion about this post