जळगाव/मुंबई । राज्यात सध्या तापमानात वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा अभाव आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यात तापमान वाढताना दिसत आहे. जळगावचे कमाल तापमानात एकाच दिवसात चार अंशापर्यंतची वाढ झाली. मात्र रात्रीच्या तापमानात घट झाली असून यामुळे थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी कमाल तापमान २९.३ अंशांवर गेले. तर रात्रीचं तापमान १०.८ अंशावर इतके होते.
आज कसं राहणार तापमान?
ढगाळ वातावरणामुळे आज राज्यातील काही भागातील गारठा कमी होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले. ढगाळ वातावरणामुळे धुके आणि दव पडू शकतात, असाही एक अंदाज आहे.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 8.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावमध्ये 9.2 तर भंडाऱ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळच्या वेळी गारठा जास्त जाणवत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, ज्यापद्धतीने शीतलहरी राज्यात दाखल व्हायला पाहिजे, त्या तुलनेत दाखल होत नाहीत. ज्यामुळे हवामानात चढउतार हा बघायला मिळतोय.















Discussion about this post