मुंबई । मुंबई-पुणे आणि मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा आणि ‘मिसिंग लिंक’च्या दुरवस्थेचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावरून सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “स्वतःच्या अंगाशी आलं की विरोधकांनी विचारलेले प्रश्न यांना राजकारण वाटू लागतात,” अशा टोमण्यांसह राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले.
राज ठाकरे म्हणाले की, “मिसिंग लिंक प्रकल्पाचा काही भाग कोसळल्यानंतर त्यावर प्रश्न उपस्थित केले तर त्याला राजकारण म्हटले जाते. पण विरोधात असताना अशाच मुद्द्यांवर आंदोलने करणारे आज सत्तेत आल्यानंतर टीका सहन करू शकत नाहीत.” सरकारने जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी टीकेला राजकारणाचे स्वरूप दिल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी “महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही” असे वक्तव्य केल्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. मिसिंग लिंक प्रकल्पावरील त्रुटींबाबत प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नसून जनतेचा हक्क असल्याचे ते म्हणाले. सरकारने सोशल मीडियावर विरोधकांविरोधात सुरू केलेल्या आक्रमक राजकारणाचे परिणाम आता स्वतःलाच भोगावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपकडून मिसिंग लिंक दुर्घटनेला “नैसर्गिक घटना” म्हटले जात असल्यावरही राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “सत्तेत असताना प्रत्येक गोष्ट नैसर्गिक म्हणायची आणि विरोधक सत्तेत असताना त्याच मुद्द्यावर आंदोलन करायचे, ही दुटप्पी भूमिका आहे,” असे ते म्हणाले. मुसळधार पावसात मुंबई पुन्हा तुंबल्याचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधांच्या कामांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केले. मागे मुंबई तुंबली. १००० मिलिमिटर पाऊस पडला होता. तेव्हा मुंबईची हालत झाली होती. आता ३०० ते ३५० मिलिलिटर पाऊस पडला. मुंबई तशीच. तुंबलेली. तेव्हा वारेमाप आंदोलन करायचे. आरोप करायचे” अशी टीका राज ठाकरेंनी केली.















Discussion about this post