मुंबई । राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. राज्य सरकारने राज्यातील सात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांचा देखील समावेश असून याबाबत आदेश जारी करण्यात आले.
फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.
सनदी या अधिकाऱ्यांच्या बदल्या
१. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
३. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
५. जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची नियुक्ती पुण्याचे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
७. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची बदली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.















Discussion about this post