नागपूर । देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार काल नागपुरात पार पडला. यावेळी अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आले. त्यामुळे यातील काही नेते नाराज झाले असून छगन भुजबळही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या भुजबळांनी आता मोठं विधान केले आहे.
‘जहाँ नही चैना वहा नही रहना’, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत आहे.
नागपूरमध्ये नाराज छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘मला निवडणूक लढवायला लावली. मी चांगल्या मतांनी निवडून आलो. राज्यसभेच सदस्यत्व स्वीकारणार नाही. तसं केलं तर माझ्या मतदारांवर विश्वासघात होईल. मी लढ्यात उतरलो. कसलं बक्षीस मिळालं, मी अजून काय सांगणार? मी तेव्हा पूर्णपणे नाकारले.’
तसंच, ‘जहाँ नही चैना वहाँ नही रहना’, असे सूचक वक्तव्य करत मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे त्यामुळे तिकडे जात असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. दरम्यान, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत.















Discussion about this post