मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्याला आता सुरुवात झाली असून त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावरून महायुतीमधील मित्रपक्षांनी पण भाजपाचे कान टोचले आहे. आता वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीत सहभागी न होण्याचा इशाराच अजित पवार गटाने दिला आहे
त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे. मराठा-ओबीसी या वादाला काऊंटर करण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले.
तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर आली आहे. तर भाजपाची मोठी कोंडी झाल्याचे दिसत आहे.















Discussion about this post