पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी अनेक वर्ष संशोधन करावे लागले. पण या पृथ्वीवरुन मानसाचे जीवनच नष्ट झाले तर काय होईल. याची भीती वैज्ञानिकांना सतावते आहे. नुकताच एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
एखाद्या महिलेच्या गर्भात वाढत असलेले भ्रूण पुरूष असेल की स्त्री हे त्याच्या आई-वडीलांच्या क्रोमोझोम्स म्हणजेच गुणसुत्रांवरून निश्चित होते. म्हणजेच महिलांच्या शरीरात दोन X (एक्स) गुणसूत्र तर पुरुषांच्या शरीरीत एक X आणि एक Y (वाय) गुणसूत्र असतात. महिला आणि पुरूष यांच्याचील XX क्रोमोझोम एकत्र आल्यास भ्रूण स्त्री बनते आणि जेव्हा XY गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा भ्रूण हे पुरूष बनते.
म्हणजेच मुलगा जन्माला येण्यासाठी Y गुणसूत्र असणे गरजे असते. जर पुरूषांमधील वाय क्रोमोझोम नष्ट झाले तर मात्र जगात मुले जन्मालाच येणारच नाहीत. तर फक्त मुलीच जन्म घेतील. याचा परिणाम म्हणून संपूर्ण मानवजातच नष्ट होऊन जाईल. एका रिसर्चमध्ये याबद्दलचा धोका वर्तवण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये वाय क्रोमोझोम कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Y गुणसूत्र मानवी लिंग कसे ठरवते?
पुरुषांमध्ये एक X आणि एक Y गुणसूत्र असते. X मध्ये सुमारे 900 जीन्स आहेत, तर Y मध्ये सुमारे 55 जीन्स असतात. भरपूर नॉन-कोडिंग DNA आहेत. Y क्रोमोसोम एक महत्त्वपूर्ण जनुक असतो जो गर्भामध्ये पुरुषांच्या विकासास सुरुवात करतो. गर्भधारणेच्या 12 आठवड्यांनंतर हे मास्टर जनुक इतर जनुकांमध्ये बदलते. हे गर्भामध्ये पुरुष संप्रेरक तयार करते ज्यामुळे बाळाचा मुलगा म्हणून विकास होतो.















Discussion about this post