जळगाव । सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कंडारी येथे घडली. समाधान एकनाथ धनगर (वय ४० रा. कंडारी ता.जळगाव) असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव असून याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
याबाबत असे की, समाधान धनगर हा तरूण आई कमलबाई, दोन भाऊ, पत्नी रेखाबाई, मुलं भैय्या आणि गोलू यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन) गेल्या काही महिन्यांपासून शेतातील सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे समाधान धनगर हा आर्थिक विवंचनेत होता.
त्यामुळे या तणावात असतांना रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्याने पिकांवर फवारणीसाठी लागणारे विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ९ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीसात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post