नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने इंग्लंडमध्ये ठेवलेले आपले 1000 क्विंटल सोने भारतात परत आणले आहे. हा निर्णय का घेण्यात आला, याबाबत देशभर कुतुहल आले. बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोऱ्यांमध्ये अनेक देश त्यांचं सोनं ठेवतात. यासाठी त्यांना ब्रिटनच्या केंद्रीय बँकेला शुल्क द्यावं लागतं. भारत हे शुल्क भरत आहे. याबाबत माहिती असलेल्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, भारत इंग्लंडमध्ये ठेवलेलं आणखी सोनं परत आणेल. बँक ऑफ इंग्लंड हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सोन्याचं भांडार आहे.
आरबीआयने काही वर्षांपूर्वी सोनं खरेदी करण्यास सुरुवात केली आणि ते नेमकं कुठं साठवायचं याचा आढावा घेण्याचं ठरवलं. परदेशात सोन्याचा जास्त साठा जमा होत असल्याने त्यातलं काही सोनं भारतात आणण्याचा निर्णय घेतला गेला. 1991च्या सुरुवातीपासूनची ही पहिलीच वेळ आहे, की भारताने आपल्या देशांतर्गत सोन्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. 1991मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक बनली होती. त्यामुळे भारताला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. आता परिस्थिती उलट असून भारत जोरात सोन्याची खरेदी करत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनेही पुन्हा सोने खरेदी सुरू केली आहे. मार्चअखेरपर्यंत रिझर्व्ह बँकेकडे ८२२.११ टन सोने आहे. त्यातील ४१३.८ टन विदेशात आहे. गेल्या वित्त वर्षात बँकेने २७.५ टन सोने खरेदी केले
इंग्लंडमध्ये का ठेवले?
सोने ठेवण्यासाठी जगभरातील देश इंग्लंडला पसंती देतात. भारतही असेच करतो. स्वातंत्र्याच्या आधीपासून भारताचा काही सोने साठा इंग्लंडमध्ये आहे. नैसर्गिक आपत्ती अथवा राजकीय अस्थिरता यासारख्या संकटांपासून वाचण्यासाठी इंग्लंडमध्ये सोने ठेवले जाते. बँक ऑफ इंग्लंडची सुरक्षा व्यवस्था व सोने हाताळणी जगात सर्वोत्तम मानली जाते.















Discussion about this post