Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कलेक्टरसह आमदारांकडून त्रास ! प्रांताधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 31, 2024
in महाराष्ट्र
0
कलेक्टरसह आमदारांकडून त्रास ! प्रांताधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोग आणि महसुलचे अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चुकीची कामे आणि आर्थिक मागणी पुर्ण करत नसल्याने वारंवार तक्रारी केल्या जात असून आता हे सर्व सहन होत नाही, आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप केला आहे. डॉ. सुहास दिवसे यांचे वर्तन राजकीय नेत्यांना अनुकूल आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना त्यांच्या अधिकारात नसताना डॉ. दिवसे यांनी माझे भूसंपादनाचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच माझी यापूर्वी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाची चौकशी सुरू असताना स्वतंत्र चौकशी पथक नेमून २८ मे रोजी कोणतीही कल्पना न देता माझ्या आणि खेड तहसीलदार यांच्या कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली.

हे सर्व खेडच्या विद्यमान आमदारांना हाताशी धरून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. खेडचे स्थानिक विद्यमान आमदारांना मी आणि माझे तहसीलदार यांचे काम सुरू ठेवू द्यायचे नाही, म्हणून राजकीय आणि आर्थिक कारणास्तव आमची बदली करायची आहे. त्यामुळे डॉ. दिवसे यांनी अधिकृतपणे काम करण्याऐवजी काही राजकीय व्यक्तींचे मध्यस्थ म्हणून काम करत आहेत, असे गंभीर आरोप कट्यारे यांनी पत्रात केले आहेत.

तसेच माझ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली नाही, तर उद्या माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदर निवडणूक निर्णय आधिकारी आणि प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेले हे आरोप गंभीर आहेत. ज्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मालकासह सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध पाजून घरगड्यानेच टाकला बंगल्यावर दरोडा

Next Post

बापरे ! ट्रॅक्टर-जेसीबीच्या मदतीने तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे ! ट्रॅक्टर-जेसीबीच्या मदतीने तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न

बापरे ! ट्रॅक्टर-जेसीबीच्या मदतीने तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

July 3, 2026
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

July 3, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page