Friday, October 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

इलेक्ट्रिक फिटिंग ठरलं जीवघेणं; जळगावातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 4, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
इलेक्ट्रिक फिटिंग ठरलं जीवघेणं; जळगावातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील जोशी कॉलनी (जोशीपेठ) परिसरात एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय कोवळ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकीम हा गेल्या सुमारे २० दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक कामगार म्हणून काम करत होता. शनिवारी जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले होते. मुस्तकीम मंदिरात उंचावर विद्युत वायर जोडण्याचे काम करत असताना, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. यामुळे मुस्तकीमला विजेचा अतिशय तीव्र धक्का बसला आणि तो उंचावरून थेट खाली कोसळला.

त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

मुस्तकीमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील एका तरुण आणि कमावत्या मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने रुग्णालयात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे मासूमवाडी परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Next Post

भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

October 9, 2026
जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

October 9, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

NICL मध्ये ३२१ पदांसाठी भरती; १.१४ लाखांपर्यंत पगार, २८ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page