मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पाच मतदारसंघांतील हाती आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, तर काही मतदारसंघांत उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही काही मतदारसंघांत आघाडी घेतल्याने राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, अमरावती मतदारसंघातून शिंदेसेनेचे किरण सरनाईक यांनी विजय मिळवला आहे. पुण्यातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. तर नागपूर मतदारसंघात सुधाकर कोहळे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर असल्याची माहिती आहे.
या निकालांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महायुतीने काही जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली असताना, विरोधी पक्षांच्या कामगिरीकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मतमोजणीतील अंतिम आकडेवारी आणि अधिकृत निकालानंतरच सर्व मतदारसंघांतील विजयाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.














Discussion about this post