Wednesday, October 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश
बातमी शेअर करा..!

जळगाव | सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटीशन क्र. 72/1998 दि.27/9/2001 च्या अंतरिम आदेशानुसार दिवाळी सणाच्या कालावधीत ध्वनी व हवा प्रदूषणामुळे होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी या निर्देशांचे पालन करून दिवाळी सण सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, पाचोरा , भूषण अहिरे यांनी केले आहे.

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, पर्यावरण (संरक्षण) नियमांमधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करण्यास बंदी आहे. तसेच साखळी फटाक्यांसाठी निर्धारित ध्वनी मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांनुसार प्रतिबंधित असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर करता येणार नाही.

फटाके वाजविण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजविण्यास मनाई आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालयांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील शांतता क्षेत्रात कोणत्याही वेळी फटाके वाजविण्यास परवानगी नाही.

ध्वनी व हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे फटाके तसेच नियमबाह्य साखळी फटाके आढळल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.

सणांच्या कालावधीत कोणतेही अपघात घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी फटाके वाजविताना आवश्यक ती दक्षता घ्यावी, मा.न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे आणि प्रशासनास सहकार्य करून दिवाळीचा आनंद सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘ते’ वक्तव्य भोवलं! संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

Next Post

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? धक्कादायक निकाल आले समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विधानपरिषदेच्या ५ जागांवर कोण मारणार बाजी? २४ तासांनंतरही मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? धक्कादायक निकाल आले समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विधानपरिषदेच्या ५ जागांवर कोण मारणार बाजी? २४ तासांनंतरही मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर

विधानपरिषद निवडणुकीत कोण आघाडीवर अन् कोण पिछाडीवर? धक्कादायक निकाल आले समोर

October 28, 2026
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवले तर कारवाई? प्रशासनाचे कडक निर्देश

October 28, 2026
एक शिंग मी तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही.. शिंदे सेनेच्या नेत्याची संजय राऊतांवर जोरदार टीका

‘ते’ वक्तव्य भोवलं! संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

October 28, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १,५०० रुपये; सरकारकडून ३४४ कोटींच्या निधीला मंजुरी

October 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page