जळगाव । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, ओल्या जागेवरून पाय घसरल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षित रामेश्वर चव्हाण (वय १.५ वर्षे, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर चव्हाण हे खासगी रुग्णालयात कार्यरत असून ते कुटुंबासह रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगर परिसरात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. शुक्रवार, २७ जून रोजी घरासमोरील जागा पावसामुळे ओली झाली होती. त्याचवेळी घराबाहेर खेळत असलेल्या हर्षितचा ओल्या जागेवरून पाय घसरला आणि तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तत्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post