Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात आज बुधवारी (२४ जून) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. घरा आवारातील बंदिस्त विहिरीची मोटार काढत असताना सिमेंटची धाप अचानक तुटल्याने ९१ वर्षीय आजोबा, त्यांचा २२ वर्षांचा नातू आणि एक शेजारी तरुण असे तिघेजण थेट ५० फूट खोल विहिरीत कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ आणि खळबळ उडाली. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत अथक परिश्रमानंतर तिघांनाही विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी भागात राहणारे रामलाल हिरामण भावसार (वय ९१) यांच्या घराच्या आवारात ५० फूट खोल लहान घरगुती विहीर आहे. या विहिरीवर सिमेंटच्या धापा (सिमेंटचे कव्हर) टाकून ती बंदिस्त करण्यात आली होती. आज बुधवारी सायंकाळी रामलाल भावसार, त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२) आणि शेजारी राहणारा तरुण देवेंद्र राजेंद्र खाचणे (वय २२) हे तिघे विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढण्याचे काम करत होते. मोटार ओढत असताना सिमेंटच्या धापेवर अचानक वजन वाढल्याने ती मधोमध तुटली आणि क्षणार्धात तिघेही थेट ५० फूट खोल विहिरीत कोसळले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत दोरखंड आणि शिडीच्या सहाय्याने विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. जवानांनी अथक परिश्रम करून विहिरीत पडलेल्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.

या भीषण घटनेत आजोबा रामलाल भावसार (वय ९१) आणि नातू सिद्धेश भावसार (वय २२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर शेजारी राहणारा तरुण देवेंद्र खाचणे हा सुदैवाने किरकोळ जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहणी केली. जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले. जळगाव शहरातील अशा प्रकारे बंदिस्त केलेल्या (वर गाळा किंवा धापा टाकलेल्या) सर्व विहिरींची तात्काळ चौकशी करून घरमालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी दिले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

Next Post

बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ; जाणून घ्या कोणते आहेत?

September 15, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; RCFL मध्ये या पदांसाठी भरती

September 15, 2026
मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

मुक्ताईनगरमध्ये डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

September 15, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधी? संभाव्य तारखा समोर, इच्छुकांची धाकधूक वाढली

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page