Friday, October 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का! सहा खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2026
in महाराष्ट्र
0
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना कडक निर्देश, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील विलिनीकरणाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सहा खासदारांचे शिंदे गटात विलिनीकरण मान्य केले होते. या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद गणपत सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सहा खासदारांचे शिंदे गटातील विलिनीकरण मान्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

लोकसभा अध्यक्षांसह सहा खासदारांना नोटीस

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लोकसभा अध्यक्षांचे कार्यालय आणि संबंधित सहा खासदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांकडून उत्तर मागवण्यात आले असून, त्यानंतर प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वीही कोर्टाने संबंधितांना नोटीस बजावून प्रकरण दोन आठवड्यांनी सुनावणीसाठी ठेवले होते. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. सहा खासदारांच्या विलिनीकरणाला मूळ पक्षाची मान्यता नसताना अशा प्रकारे विलिनीकरणाला परवानगी देता येते का, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे.

शिंदे गटाची लोकसभेतील ताकद १३ वर

शिवसेना ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची लोकसभेतील संख्या १३ वर पोहोचली. लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलै रोजी या सहा खासदारांच्या पक्षबदलाची नोंद घेत शिंदे गटाला मान्यता दिली होती. सुप्रीम कोर्टाने सध्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती न दिल्याने हा निर्णय कायम आहे. मात्र, प्रकरणाची अंतिम कायदेशीर लढाई अद्याप बाकी असून, पुढील सुनावणीत कोर्ट या याचिकेतील मुद्द्यांवर विचार करणार आहे. त्यामुळे सहा खासदारांच्या विलिनीकरणाच्या प्रकरणाकडे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात आज सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Next Post

जळगाव जिल्ह्यात हातभट्ट्यांवर पोलिसांचा धडाका; मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन नष्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात हातभट्ट्यांवर पोलिसांचा धडाका; मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन नष्ट

जळगाव जिल्ह्यात हातभट्ट्यांवर पोलिसांचा धडाका; मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन नष्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

October 9, 2026
जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

October 9, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

NICL मध्ये ३२१ पदांसाठी भरती; १.१४ लाखांपर्यंत पगार, २८ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page