जळगाव । जळगाव : महावितरणच्या जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश जारी केले.
जळगाव मंडळातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी, वाढते ट्रान्सफॉर्मर बिघाड, ६७ कोटी रुपयांहून अधिक वीज बिलांची थकबाकी आणि वीज चोरीची तब्बल २ हजार १६९ प्रकरणे यांची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई आणि वसुली न झाल्याने प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय नाशिक परिमंडळातील मुख्य अभियंता कार्यालयात निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार नाशिक येथे हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.















Discussion about this post