Wednesday, August 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पारोळ्यात कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये लपवून रेशनच्या धान्याची तस्करी उघड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

पारोळा । शासकीय रेशनिंगचा गहू आणि तांदूळ कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये लपवून काळ्या बाजारात तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार पारोळा शहरात उघडकीस आला आहे. पारोळा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ७३.५४ क्विंटल धान्य आणि मालवाहू ट्रक असा एकूण ७ लाख १२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धान्यमालक सुभाष विठ्ठल वाणी (वय ६१, रा. पारोळा) आणि एक फरार अज्ञात ट्रक चालक यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना नेमकी कशी घडली?

पारोळा शहरातील ‘सप्तर्षी मंगल कार्यालया’च्या समोर आणि भाग्यश्री टोल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही संशयित हालचाली सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

सप्तर्षी मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या केशरी मालवाहू ट्रकमध्ये (क्र. एमएच १६ एई ६८६६) तपासणी केली असता, प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी संशयितांनी कोणत्याही वैध परवान्याशिवाय कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरल्याचे निदर्शनास आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्दामेलाचा तपशील:

५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा केशरी मालवाहू ट्रक, १६२ गोण्या गहू व २ लाख १२ हजार ९७० रुपयांचा तांदूळ (वजन ७३.५४ क्विंटल), असा एकूण ७ लाख १२ हजार, ९७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास
सुभाष वाणी आणि ट्रक चालकाने आपसात संगनमत करून हा रेशनचा साठा बेकायदेशीररीत्या काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला होता. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई भूषण राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! छगन भुजबळांचा गिरीश महाजनांना टोला अन् शुभेच्छाही, म्हणाले..

Next Post

धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

गुटख्याने भरलेल्या बोलेरोची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

August 19, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

August 19, 2026
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी

August 19, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पारोळ्यात कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये लपवून रेशनच्या धान्याची तस्करी उघड; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page