Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या विद्यमान मंत्र्यांची धाकधूक वाढली; या चार जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 2, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर
बातमी शेअर करा..!

मुंबई । एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे महायुतीत उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राला ३१ वा मुख्यमंत्री मिळणार आहे. पण त्याआधी महायुतीमध्ये खातेवाटपावरुन तिढा असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या बैठकीत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असे बोलले जात आहे. पण त्याआधी एखनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची मुंबईत बैठक बोलवली आहे, त्यामध्ये ते संबोधित करणार असल्याचे समजतेय.

शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली –
महायुतीमध्ये शिवसेनेला १२ ते १३ मंत्रि‍पदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे शिवसेनेला किती मिळतील, हे अद्याप समोर आलेले नाही. गृहमंत्रालयावरून खातेवाटप रखडल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितले. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली आहे.

येत्या नव्या मंत्रिमंडळात ४ नव्या आमदांराची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर ४ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय.

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री होते?
उदय सामंत
दीपक केसकर
शंभूराज देसाई
दादा भुसे
गुलाबराव पाटील
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
संदीपान भुमरे (सध्या खासदार)
संजय राठोड

कुणाचा पत्ता कट होण्याची शक्यता –
सत्ता स्थापनेवेळी आमदारांच्या कार्यक्षमता, वर्तणूक इतिहास विचारात घेऊन मंत्रिपद दिली जाणार असल्याची माहिती आहे. कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी (वादग्रस्त) नसलेला चेहरा मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील यांच्यावरही टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. संदीपान भुमरे सध्या खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी कुणाला संधी मिळते? हे पाहणेही औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुन्हा कुणाला संधी मिळणार? नवा चेहरा कोण ?
जुने चेहरे टाळून नव्या चेहऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ⁠खाते वाटपही त्याच धर्तीवर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातेय. त्याशिवाय महिला चेहराही मंत्रिमंडळामध्ये घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मागील मंत्रिमंडळात असमारे उदय सामंत, दीपक केसकर, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भावना गवळी यांच्या नावाची शिवसेनेत मंत्रि‍पदाची चर्चा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात नोकरी करण्याची संधी! २१९ रिक्त पदांसाठी भरती

Next Post

अमित शाह यांनी मागवले महायुतीच्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड; या अटींची पुर्तता करणाऱ्यास मंत्रीपद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमित शहा या तारखेला जळगावात येणार ; कधी आणि कसे आहे दौऱ्याचे नियोजन?

अमित शाह यांनी मागवले महायुतीच्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड; या अटींची पुर्तता करणाऱ्यास मंत्रीपद?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट रद्द, २ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

July 10, 2026
भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

July 10, 2026
जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एलसीबीची मोठी कारवाई; सापळा रचून एमडी तस्करांच्या आवळल्या मुसक्या, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

जळगावातील कुपोषणाचा मुद्दा विधानपरिषदेत; एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर सरकारचे स्पष्टीकरण

July 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page