भुसावळ/मुंबई । देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून प्रवाशांना कमी खर्चात लांब पल्ल्याचा प्रवास करता यावा, यासाठी रेल्वेच्या ताफ्यात आता आणखी ७ अमृत भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने या नव्या गाड्यांना मंजुरी दिली असून, यातील दोन अमृत भारत एक्सप्रेस भुसावळमार्गे धावणार आहेत.
या नव्या सेवांमध्ये प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुभेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन गाड्यांचा समावेश असल्यामुळे भुसावळ, खान्देशासह महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
धनबाद-कोयंबटूर अमृत भारत एक्स्प्रेस
धनबाद, कोयंबटूर दरम्यान धावणारी ही ट्रेन अनेक राज्यातून धावणार आहे. ही ट्रेन गोमो, पारसनाथ, कोडरमा, गया, सासाराम, प्रयागराज, छिवकी, कटनी, जबलपूर , इटारसी, नागपूर, चंद्रपूर, वारंगल आणि विजयवाडा सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस
ही ट्रेन प्रयागराजहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे. ट्रेन ही प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, कल्याण स्थानकांवर थांबेले. ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
सुबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस
सुबेदारगंजवरून ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत धावणार आहे. आठवड्यातून एकदा ही ट्रेन चालवण्यात येईल. या मार्गात ही ट्रेन फतेहपूर, गोविंदपूर, बांदा, चित्रकूटधाम, सतना, कटनी , जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, ठाणे या स्टेशनवर थांबणार आहे.
गोरखपूर-दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस
गोरखपूरहून दिल्लीला ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनमुळे उत्तर प्रदेशातील नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. ही ट्रेन खलीलाबाद, बस्ती, गोंडा, सीतापूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद या स्टेशनवर थांबणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवण्यात येईल.
प्रयागराज-उधना अमृत भारत एक्स्प्रेस
प्रयागराजहून गुजरातला ही ट्रेन धावणार आहे. या ट्रेनच्या मार्गात फतेहपूर, इटावा, टूंडला, आगरा, बयाना, गंगापूर सिटी, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा स्थानकावर थांबेल.
गोरखपूर-वांद्रे टर्मिनस
गोरखपूर-वांद्रे टर्मिनस ही ट्रेन आठवड्यातून एकदा चालवली जाईल. या ट्रेनच्या मार्गात बस्ती, गोंडा, कानपूर, कानपूर, आग्रा किल्ला, कोटा, रतलाम, वडोदरा, सूरत, वलसाड, वापी, बोरीवली, वांद्रे टर्मिनस या स्थानकांचा समावेश असेल.
चारलापल्ली-गोरखपूर अमृत भारत एक्स्प्रेस
सातवी ट्रेन ही चारलापल्लीहून गोरखपूरदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन काडीपेट, पेड्डापल्ली, मंचेरियाल, बल्हारशाह, नागपूर, बैतूल, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, कानपूर, लखनऊ, गोमतीनगर, बाराबंकी, गोंडा, गोरखपूर स्टेशनवर थांबेल.














Discussion about this post