Tuesday, October 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘१० झाडांची हत्या म्हणजे एक कसाब’; संजय राऊतांचा उज्ज्वल निकमांवर घणाघात!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 27, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
‘१० झाडांची हत्या म्हणजे एक कसाब’; संजय राऊतांचा उज्ज्वल निकमांवर घणाघात!
बातमी शेअर करा..!

मुंबई । कर्जत येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारच्या बाजूने उभे राहून पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाचे समर्थन करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. “१० झाडे तोडणे म्हणजे एक कसाब आहे. आम्ही झाडे आणि कसाब यांना एकाच तराजूत तोलतो,” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी निकम यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी ही टीका केली.

उज्ज्वल निकम यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमचे मित्र आहेत; मात्र, एका खासदारकीसाठी त्यांनी आपल्या अब्रूची लक्तरे काढली आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. निकम हे भाजपच्या बाजूने उभे राहत असून, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांचे समर्थन करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

कसाब प्रकरणात मानवतावादाची भूमिका मांडणाऱ्या निकम यांनी आता पर्यावरणाच्या मुद्द्यावरही संवेदनशील भूमिका घ्यायला हवी होती, असे राऊत म्हणाले. भाजप चांगल्या व्यक्तींचा राजकीय वापर करून घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘अदानींसाठी जंगलांवर कुऱ्हाड का?’

चंद्रपूरमध्ये अदानी समूहाला खाणी दिल्या जात असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवरही टीका केली. छत्तीसगडमध्ये जंगलांचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी विदर्भातील जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला.

विदर्भातील जंगलसंपत्ती आणि व्याघ्र प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेता, विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. विदर्भाचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृक्षतोडीला विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावर आंदोलन करावे, आम्ही त्यांना साथ देऊ, असेही राऊत म्हणाले. “आम्हाला उद्योगपती हवेत; पण ते महाराष्ट्र उभा करणारे हवेत. टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर यांच्यासारख्या उद्योगपतींनी महाराष्ट्राचे वैभव वाढवले. राज्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणारे उद्योग आम्हाला नकोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘आदिवासींना बळ द्या’

कर्जतमधील वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देताना संजय राऊत यांनी आरे येथील आंदोलनाचाही उल्लेख केला. आरेमधील आंदोलन संपलेले नसून, आता कर्जतमध्येही आंदोलन सुरू झाले आहे. भविष्यात विदर्भातही या मुद्द्यावर आंदोलनाची ठिणगी पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला. आदित्य ठाकरे या आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याचे सांगत राऊत यांनी इतर राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, वृक्षतोडीविरोधात लढणाऱ्या आदिवासींना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडली.कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा आता पर्यावरणापुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकार, भाजप आणि उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या टीकेमुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतात विजेचा धक्का बसून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू; भुसावळ तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Next Post

दिवाळीपूर्वीच साखरेचा गोडवा महागला! किलोमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

दिवाळीपूर्वीच साखरेचा गोडवा महागला! किलोमागे 'इतक्या' रुपयांची वाढ?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर

सरकारी नोकरीची मोठी संधी! सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती; १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

October 27, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

दिवाळीपूर्वीच साखरेचा गोडवा महागला! किलोमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

October 27, 2026
‘१० झाडांची हत्या म्हणजे एक कसाब’; संजय राऊतांचा उज्ज्वल निकमांवर घणाघात!

‘१० झाडांची हत्या म्हणजे एक कसाब’; संजय राऊतांचा उज्ज्वल निकमांवर घणाघात!

October 27, 2026
शेतात विजेचा धक्का बसून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू; भुसावळ तालुक्यातील हृदयद्रावक घटना

शेतात विजेचा धक्का बसून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू; भुसावळ तालुक्यातील हृदयद्रावक घटना

October 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page