Saturday, September 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘कर्नाटकला जमलं, महाराष्ट्राला का नाही?’ दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला सवाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2026
in महाराष्ट्र
0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीवरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. तसेच एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आधीच मदत देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. “कर्नाटक सरकार दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू शकते, तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही?” असा सवाल त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

कर्नाटकचा दाखला देत सरकारला सवाल

रोहित पवार यांनी कर्नाटकातील परिस्थितीचा दाखला देत महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्नाटकात दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करून केंद्राकडे आपत्ती निवारण निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने सुरुवातीला १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून, केंद्राकडे एनडीआरएफच्या निकषांनुसार मदतीची मागणी करण्याची तयारी असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रातही पावसाचा मोठा खंड आणि पीक नुकसानीची परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा का केली जात आहे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.

“सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये”

रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत, परतीच्या पावसामुळे काही भागात पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची गरज कमी होईल आणि त्यामुळे सरकारी निधी वाचेल, असा सरकारचा अंदाज असल्यास तो शेतकऱ्यांवरील अन्याय ठरेल, असा आरोप केला.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र एनडीआरएफच्या मदतीसाठी आवश्यक प्रक्रियेनुसार ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे केले जातील, असे सांगितले असून, एनडीआरएफची मदत मिळण्याची वाट न पाहता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया, पंचनामे आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत या मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांनो..! रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी सरकार देणार अनुदान ; किती मिळणार? अन् कुठे अर्ज कराल?

Next Post

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे १२ गाड्या रद्द, या एक्स्प्रेस धावणार उशिराने

September 19, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

September 19, 2026
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

September 19, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

‘कर्नाटकला जमलं, महाराष्ट्राला का नाही?’ दुष्काळाच्या मुद्द्यावर रोहित पवारांचा सरकारला सवाल

September 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page