Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अजून किती खालची पातळी गाठणार? मंत्री गुलाबराव पाटलांच्या त्या विधानावरून रोहित पवारांचा हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 29, 2025
in Uncategorized
0
विद्यार्थी फोडा म्हणणाऱ्या गुलाबराव पाटीलांना रोहित पवारांनी डिवचलं, म्हणाले…
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील नेते प्रचार सभा घेत असून याच दरम्यान पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ‘लक्ष्मी’बाबतच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. “एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा, कारण लक्ष्मी येणार आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होते.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर जनता व विरोधी पक्षांनी टीका केल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. यावेळी ते म्हणाले, “लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा होत नाही, तर लक्ष्मी आपल्या आई बहिणीचंही नाव असतं.” यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की गुलाबरावांना ‘लक्ष्मी’चा संदर्भ आई-बहिणींच्या रूपाने द्यायचा होता, तर “घराबाहेर खाटा टाकण्याचं” वक्तव्य कशासाठी होतं? त्यांच्या मूळ वक्तव्याचा आणि नंतर दिलेल्या स्पष्टीकरणाचा संबंध लागत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या दोन्ही वक्तव्यांचा संदर्भ देत गुलाबरावांवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “नखापासून केसापर्यंत सत्तेची नशा अंगी भिनलेला माणूस कसा बेभान होतो हे गुलाबराव पाटलांमध्ये दिसतं. ‘रात्री लक्ष्मी येणार, बाहेर खाट टाकून झोपा’ म्हणणारे गुलाबराव आता हे आईबहिणींच्या बाबतीत बोलल्याचं निर्लज्जपणे सांगतायत. राजकीय जन्म दिलेल्या पक्षाचं भान राहीलं नाही तरी किमान आया-बहिणींच्या नात्याचं तरी भान ठेवा. राजकीय स्वार्थासाठी अजून किती खालची पातळी गाठणार? महाराष्ट्रात असं राजकारण योग्य नाही!

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘मुंह मे राम, बगल मे अडानी’ ; तपोवन येथील वृक्षतोडीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर सडकून टीका

Next Post

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ; निवडणुकीसाठी २ डिसेंबरला पगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ; निवडणुकीसाठी २ डिसेंबरला पगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page