रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ऑफिसर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया २९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. जे तरुण सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही योग्य संधी आहे. त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
रिझर्व्ह बँकेत ६० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये आर्थिक धोरण संशोधन विभाग आणि सांख्यिकी माहिती व्यवस्थापन विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांसाठी अर्जप्रक्रिया २९ एप्रिल म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२६ आहे. ही भरती परीक्षेद्वारे होणार आहे. दोन परीक्षा होणार आहे. या नोकरीसाठी पहिली परीक्षा १४ जून रोजी होऊ शकते. यानंतर टप्पा दोन ऑनलाइन परीक्षा २५ जुलै २०२६ रोजी होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करावी.
या पदांसाठी होणार भरती
ग्रेड बीमधील अधिकारी जनरल पदासाठी ४० जागा रिक्त आहे. ग्रेड ही अधिकारी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन विभागात १० पदे रिक्त आहेत. सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभागात १० पदांसाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
रिझर्व्ह बँकेच्या ग्रेड बी ऑफिसर पदासाठी विभागानुसार पात्रता वेगवेगळी असणार आहे. ग्रेड बी जनरलसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रेड बी डीआर पदासाठी अर्थशास्त्र किंवा वित्त क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. ग्रेड बी डीआयएसएमसाठी सांख्यिकी, गणित किंवा डेटा क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
रिझर्व्ह बँकेतील या भरतीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी प्रिलियम्स, मेन्स अशा दोन परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुलाखत होणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.















Discussion about this post