Saturday, July 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“महाराष्ट्राची प्रतिमा डागाळू नका!” राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवरून संताप!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 4, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांच्या वर्तनावर आणि वक्तव्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. चुका करणाऱ्यांना पाठीशी घालून सरकार स्वतःची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात प्रसिद्ध “Power corrupts…” या उक्तीचा उल्लेख करत, सत्तेचा गैरवापर आणि सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या असंवेदनशीलतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. वेडेवाकडे वागणाऱ्या आणि समाजात चुकीचा संदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वकीयांच्या चुकांवर पांघरूण घालणे थांबवावे, असे त्यांनी फडणवीसांना स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

पत्रात राज ठाकरे यांनी भाजपवरही थेट निशाणा साधला आहे. “भाजपला माज आला आहे… आणि तो संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे का?” असा सवाल करत त्यांनी राज्यातील राजकारणाची घसरलेली पातळी अधोरेखित केली. तसेच, “तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि तुम्ही त्यावर अवाक्षरही बोलत नाही,” अशी टीका करत त्यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज ठाकरेंचं पत्र जसेच्या तसे, पाहा नेमकं काय म्हणाले…?

प्रति

श्री. देवेंद्र फडणवीस,

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?

देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !

तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.

कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.

मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.

आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?

तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.

खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.

तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.

राज ठाकरे ।

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; २,६१९ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Next Post

जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

July 4, 2026
मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..

“महाराष्ट्राची प्रतिमा डागाळू नका!” राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवरून संताप!

July 4, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; २,६१९ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

July 4, 2026
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

July 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page