Sunday, May 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बदलत्या जगात मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले अस्तित्व कायम ठेवले ; कुलगुरू माहेश्वरी

आठ पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने गौरविण्यात आले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 9, 2024
in जळगाव जिल्हा
0
बदलत्या जगात मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले अस्तित्व कायम ठेवले ; कुलगुरू माहेश्वरी
बातमी शेअर करा..!

जळगाव । लोकशाही दृढ करण्याचे मोठे काम प्रसिध्दी माध्यमाकडून केले जात असून जग झपाट्याने बदलत असतांनाही मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आपले अस्तित्व कायम ठेवले असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आठ पत्रकारांना दर्पणकार पुरस्काराने पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी मंचावर उच्च शिक्षण विभागाच्या जळगावचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, माध्यम शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर, पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा उपस्थित होते.

प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विद्यापीठाला प्रसिध्दी माध्यमांनी कायम साथ दिल्यामुळे विद्यापीठाचे उपक्रम, उद्दिष्ट्ये पोहचविता आलीत, प्रसिध्दी माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल होवून देखील मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे महत्व आणि विश्वासहर्ता टिकून आहे. सहसंचालक डॉ. संजय ठाकरे म्हणाले की, समाजाचे चित्र हे प्रसिध्दी माध्यमातून घडत असते. पत्रकार हा समाजाचा मोठा जबाबदार घटक आहे. उच्च शिक्षणातील विविध बदलांबाबत माध्यमांनी प्रसिध्दी देण्यासाठी जागा राखून ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा. सुधीर भटकर म्हणाले की, समाजातील चांगल्या वाईट घटना पत्रकार समाजासमोर आणत असल्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. प्रवीण सपकाळे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

या समारंभात प्रिंट मीडिया : विलास बारी (लोकमत), प्रदीप राजपूत(दिव्यमराठी), देविदास वाणी(सकाळ), राजेंद्र पाटील(पुण्यनगरी), इलेक्ट्रॉनिक मीडिया : चंद्रशेखर नेवे(एबीपी माझा), सचिन गोसावी(दूरदर्शन), डिजिटल मीडिया : संतोष सोनवणे (मॅक्स मराठी), छायाचित्रकार: आबा मकासरे (छायाचित्रकार) यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने विलास बारी व चंद्रशेखर नेवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण ब्राम्हणे, भरत काळे, कमलाकर वाणी या पत्रकारांचा तसेच जैन उद्योग समुहाच्या माध्यम विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. गोपी सोरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ॲङ सुर्यंकांत देशमुख यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम स्थळी झालेल्या रक्तदान शिबिरात १० जणांनी रक्तदान केले. रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने झालेल्या या रक्तदान शिबीरासाठी रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, ऍड.दिपक पाटील व दानिश खान यांनी, तर कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेतील प्रा.रोहित देशमुख, रंजना चौधरी,प्रल्हाद लोहार,विक्रांत केदार,भिकन बनसोडे, शैलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळ चोरट्यांनी व्यापाऱ्याचे घर फोडले ; साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

Next Post

12वी पास उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये ऑफिसर होण्याची संधी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नौदलात अग्निवीर बनण्याची मोठी संधी ! तब्बल 1365 रिक्त पदांच्या भरती

12वी पास उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये ऑफिसर होण्याची संधी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page