Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 15, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
कोचिंग क्लासचा हजारोंचा खर्च वाचणार! लालकिल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । स्पर्धा परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंगची व्यवस्था उभारण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञानासह युवकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला.

कोचिंगचा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोठ्या शुल्काचे खासगी क्लासेस लावावे लागतात. त्यामुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारकडून मोफत ऑनलाइन कोचिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. डिजिटल सार्वजनिक सुविधांचा वापर, दर्जेदार शिक्षक आणि उपलब्ध तंत्रज्ञान यांना एकत्र आणून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंगचे नेटवर्क तयार केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून दूर जाऊन महागडे क्लासेस लावण्याची गरज कमी होईल, असा सरकारचा उद्देश आहे.

गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा

कोचिंगसाठी दरवर्षी होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.ऑनलाइन माध्यमातून दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्यास मदत होईल.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील कौशल्य विकासावरही भर दिला. आगामी एका वर्षात देशातील १ कोटी तरुणांना AI कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.AI क्षेत्राचा विस्तार होत असताना भारतातील तरुणांना या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कौशल्ये मिळणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. यामुळे भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

भारतामध्ये आगामी काळात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारली जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये गुगल डेटा सेंटर उभारत असून, गुजरातमध्ये मेटा आणि रिलायन्सच्या माध्यमातून डेटा सेंटर उभारण्याची योजना असल्याचे मोदी यांनी नमूद केले. देशात तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार होत असताना त्याचा सर्वाधिक फायदा भारतीय तरुणांना मिळावा, यासाठी सरकार कौशल्य विकासावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भीषण अपघात; तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी जम्बो भरती ; १०वी-ITI उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी जम्बो भरती ; १०वी-ITI उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page