मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ६१२ जागा भरल्या जाणार असून, १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, फिटर, वायरमन, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, कोपा यांसह विविध ट्रेडचा समावेश आहे.
कोणत्या ट्रेडमध्ये किती जागा?
इलेक्ट्रिशियन – ४०
प्लंबर – ६६
रेफ्रिजरेशन अँड AC मेकॅनिक – ६
ड्राफ्ट्समन सिव्हिल – ५
टर्नर – ४
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर – ३
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर – ४
डिझेल मेकॅनिक – ८७
मशिनिस्ट – १
वायरमन – ३३
फिटर – ५८
मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन) – २८
कारपेंटर – २०
पेंटर जनरल – १३
मेकॅनिक मोटर व्हेईकल – ३९
वेल्डर – १६
कोपा – १५४
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – ३५
अशाप्रकारे विविध ट्रेडमध्ये मिळून ६१२ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ज्या ट्रेडसाठी अर्ज करायचा आहे, त्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय किमान १४ वर्षे पूर्ण असावे.
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
अर्जासाठी फी नाही
या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून, उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांसह भरती मेळाव्यास उपस्थित राहणे आवश्यक आहे.
दोन दिवस भरती मेळावा
भरती मेळाव्याचे आयोजन जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, एस.टी. वर्कशॉपजवळ, किरोळ रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई – ४०००८६ येथे करण्यात आले आहे.
ट्रेडनुसार भरती मेळाव्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत :
२० ऑगस्ट २०२६ : अ. क्र. १ ते ९ ट्रेडसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
२१ ऑगस्ट २०२६ : अ. क्र. १० ते १८ ट्रेडसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
ITI उत्तीर्ण तरुणांसाठी BMC सारख्या मोठ्या महापालिकेत अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेण्याची ही चांगली संधी असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत भरती मेळाव्यास उपस्थित राहावे.














Discussion about this post