Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बनावट दस्तऐवज बनवून सरकारी जमीन घशात! ७ ग्रामसेवक, ८ सरपंच ४० भूमाफियांवर कारवाईचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 9, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
बनावट दस्तऐवज बनवून सरकारी जमीन घशात!  ७ ग्रामसेवक, ८ सरपंच ४० भूमाफियांवर कारवाईचे आदेश
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथे शासकीय गायरान जमीन बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रांचा मोठा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. शासकीय कार्यालयांचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि ग्रामपंचायत दप्तरी बोगस नोंदी करून तब्बल दोन एकर सरकारी जमीन खासगी नावावर दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तत्कालीन ७ ग्रामसेवक, ८ आजी-माजी सरपंच आणि ४० भूमाफियांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित जमीन पुन्हा शासकीय ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी या प्रकरणी गेल्या साडेचार वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने तपास सुरू केला. तपासादरम्यान गट क्रमांक १४० (सर्व्हे क्रमांक ८४) मधील सरकारी गायरान जमिनीचे बनावट ‘नमुना ८’ उतारे तयार करण्यात आल्याचे समोर आले.

या उताऱ्यांवर शासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तसेच बनावट शिक्क्यांचाही वापर करण्यात आला. त्यानंतर संबंधित जमीन खासगी मालकीची असल्याचे दाखवून ग्रामपंचायतीच्या अधिकृत नोंदींमध्ये बोगस माहिती नोंदवण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल विभाग आता ॲक्शन मोडमध्ये आला असून संबंधित गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवून जागा पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पारोळा तालुक्यात खळबळ उडाली असून शासकीय जमिनींच्या गैरव्यवहारांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या घोटाळ्यात तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि इतर संबंधितांवर फौजदारी तसेच प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता असून पुढील चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एलआयसीमध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी

Next Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेकने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेकने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेकने राजकीय वर्तुळात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेकने राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेकने राजकीय वर्तुळात खळबळ

May 9, 2026
बनावट दस्तऐवज बनवून सरकारी जमीन घशात!  ७ ग्रामसेवक, ८ सरपंच ४० भूमाफियांवर कारवाईचे आदेश

बनावट दस्तऐवज बनवून सरकारी जमीन घशात! ७ ग्रामसेवक, ८ सरपंच ४० भूमाफियांवर कारवाईचे आदेश

May 9, 2026
एलआयसी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; पात्रता घ्या जाणून

एलआयसीमध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी

May 9, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; जळगावात उच्चांकी तापमान

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page