सरकारी क्षेत्रात नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. NTPC Green Energy Limited (NGEL) ने विविध पदांसाठी एकूण 114 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
भरतीचा तपशील
असिस्टंट इंजिनिअर – RE : 100 पदे
डेप्युटी जनरल मॅनेजर – RE : 14 पदे
एकूण पदे : 114
शैक्षणिक पात्रता
असिस्टंट इंजिनिअर – RE
इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
डेप्युटी जनरल मॅनेजर – RE
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल किंवा मेकॅनिकल शाखेतील किमान 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण श्रेणी ग्राह्य.)
संबंधित क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा (31 जुलै 2026 रोजी)
असिस्टंट इंजिनिअर – RE: कमाल 40 वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर – RE: कमाल 44 वर्षे
आरक्षणानुसार वयात सवलत
SC/ST : 5 वर्षे
OBC : 3 वर्षे
अर्ज शुल्क
General / OBC / EWS : ₹500
SC / ST / PwBD / माजी सैनिक / महिला : शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात केली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
31 जुलै 2026 (सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














Discussion about this post